हे पुस्तक तुम्हाला तुमच्या प्रत्येक व्यवहारामागच्या भूमिकेचा (सकारात्मक / नकारात्मक) विचार करायला लावेल. दृष्टिकोन, महत्त्वाकांक्षा, कृती याविषयी नेमके मार्गदर्शन करून तुम्हाला सकारात्मक विचार करायला शिकवेल. त्यातूनच यशप्राप्तीसाठी आपली कामगिरी इतरांच्या तुलनेत अधिक सरस कशी करायची हेही तुम्ही शिकाल.